काँग्रेस सांसद एच वसंत कुमार यांचे निधन…

चेन्नई, २९ ऑगस्ट २०२०: काल शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट ,२०२० रोजी ,काँग्रेसचे जेष्ठ सांसद एच वसंत कुमार यांचे ७० व्या वर्षी निधन झाले आहे. वसंत कुमार हे तामिळनाडूच्या कन्याकुमारीचे सांसद होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यामुळेच त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. तसेच त्यांचे उपचार हे चेन्नई मधील अपोलो रुग्णालयात सुरू होते. त्यांना या रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी भरती करण्यात आले होते.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, एच वसंत कुमार यांना १० ऑगस्ट रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले . त्यांना कोव्हिड आणि निमोनिया झाला होता. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती हळू हळू खालावत गेली आणि दिवसागणिक अस्थिर होत गेली. त्यामुळे त्यांचे काल निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर द्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले,” त्यांच्या निधनाने आम्ही दुखी आहोत. तसेच व्यापार आणि सामाजिक सेवा यांमध्ये त्यांची प्रगती ही उल्लेखनीय होती .तसेच त्यांच्यासोबत बातचीत करत असताना नेहमी तामिळनाडूच्या प्रगती बद्दल त्यांचा उत्साह मी पाहिला आहे. त्यांच्या परिवार आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना. “ओम शांती”.

न्यूज अनकट प्रतीनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा