हैद्राबाद : भारतीय वंशाची माणसे आपल्या बुद्धी चातुर्याने जगात प्रसिद्ध आहेतच. जर आपल्याला कुणी विचारलं की तुमच्या मेंदूची साइज किती तर तुम्ही यावर काय उत्तर द्याल? हैद्राबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंफॉर्ममेशन टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी मेंदुबद्दल संशोधन केले आहे.
त्या संशोधनात भारतीय लोकांचा मेंदू हा जगातील इतर देशांच्या तुलनेत लहान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय नागरिकांचा मेंदू हा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील लोकांच्या तुलनेने आणि आकाराने लहान असल्याचे या संशोधांमधून समोर आले आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीला अधिक माहिती देताना प्रोजेक्टर प्रमुख जयंती शिवास्वामी यांनी सांगितले की, मेंदूचे आजार समोर ठेवून केले गेलेले आहे.त्यानुसार मॉट्रीयल न्यूउरोलिजिकल इन्स्टिट्यूट टेम्लेट (MNI)वापर करण्यात येतो. हे करण्यात आलेले संशोधन सर्व भारतीयांसाठी नक्कीच एक प्रेरणा देणारे ठरेल असे शिवास्वामी यांनी सांगितले.