बकोरी, दि. ३० ऑगस्ट २०२०: बकोरी ता. हवेली जि पुणे येथील माहीती आधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे, यांना पुणे ग्रामिण पोलीसांच्या माध्यमातुन दोन सशस्र अंगरक्षक देण्यात आले आहेत. वारघडे हे अनेक वर्षांपासुन माहीती आधिकार कार्यकर्ता म्हणुन काम करत आहेत. त्यांची माहीती सेवा समिती या नावाची सामाजिक संस्था आहे.
त्यांच्या माध्यमातून राज्यभर त्यांचे काम चालू आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली आहेत, त्यामुळे त्यांचे जिवीतास धोका निर्माण झाला होता. मधल्या काळात त्यांचे गाडीवर हल्ला झाल्याने त्यांना अनेक धमक्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मा. संदिप पाटील, व गृहविभाग मुंबई याठीकाणी संरक्षण मिळणेबाबत अर्ज केला होता.
पुणे एस. आय. टी. लोणिकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणकर यांनी त्याबाबत सखोल चौकशी करून अहवाल पाठवला व त्यानंतर पोलीस अधिक्षक मा. संदिप पाटील यांनी दोन सशस्र अंगरक्षक देण्याबाबत आज आदेश केला आहे. व आज चंद्रकांत वारघडे, यांना अंगरक्षक देण्यात आले. अंगरक्षक मिळाल्यामुळे माझ्या कामाला अजून ताकद मिळाली आहे. त्यामुळे मी अजुन समाजासाठी काम करेन असे बोलताना वारघडे यांनी सांगितले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मा. संदिप पाटील, लोणिकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. प्रताप माणकर यांचे वारघडे यांनी अभार मानले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे