वॉशिंग्टन, १ सप्टेंबर २०२०: सोमवारी टेस्लाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क जगातील तिसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले. टेस्ला शेअर्समध्ये जोरदार वाढ बघण्यास मिळाली. टेस्ला शेअर्स लवकरच पाच भागांमध्ये विभागले जातील.
टेस्लाचे शेअर्स सोमवारी १२.५७ टक्क्यांनी वाढून ४९८.३२ डॉलरवर पोचले. ब्लूमबर्ग ‘बिलियनेयर इंडेक्स’ निर्देशांकानुसार, सोमवारपर्यंत मस्क यांची संपत्ती ११५ अब्ज डॉलर्स इतकी आहे, तर झुकरबर्ग यांची संपत्ती १११ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
टेस्ला व्यतिरिक्त न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये एप्पलच्या शेअर्सचे ही विभाजन झाले आणि त्यानंतर शेअर मध्ये तेजी बघण्यास मिळाली. विश्लेषकांच्या मते या दोन्ही कंपन्यांमधील किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी वाढेल. याशिवाय नुकत्याच झालेल्या रॅलीनंतर दोन्ही समभागात नफा बुकिंगही होऊ शकते.
यावर्षी टेस्लाच्या शेअर्सने जोरदार झेप घेतली आहे. सन २०२० मध्ये, इलोन मस्क यांची कंपनी ४८० टक्क्यांपर्यंत ऊसंडी मारली आहे. गेल्या आठवड्यात टेस्ला शेअर्स २,२९० डॉलरच्या शिखरावर पोहोचले. २०१० मध्ये कंपनीला १७ डॉलर प्रति शेअरने सूचीबद्ध केले होते. या शेअर्सने अनेक रिटेल गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवले आहे.
११ ऑगस्ट रोजी या इलेक्ट्रिक कार कंपनीने शेअर्स मध्ये विभाजनाची घोषणा केली, त्यानंतर शेअर ५० टक्क्यांनी वाढला आहे. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी लवकरच एसएंडपी ५०० निर्देशांकात समाविष्ट होऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी