बारामती, ३ सप्टेंबर २०२०: टी.व्ही.9 चे पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यवस्थेचा गलथान कारभार करणार्या दोषींवर कारवाई व तातडीने कोरोना योद्धा म्हणून तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघ, यांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांच्याकडे मागणी केली आहे.
बारामती उपविभागीय अधिकारी येथील नायब तहसिलदार भक्ती देवकाते यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर जन्नू, ज्येष्ठ संपादक दत्ता महाडिक, तैनुर शेख, सोमनाथ कवडे, सुनिल शिंदे, साधु बल्लाळ, उमेश दुबे, प्रशांत तुपे, नवनाथ बोरकर, विकास कोकरे, श्याम शिंदे, तानाजी पाथरकर, सागर सस्ते इ. पत्रकार उपस्थित होते.
दि. 30 ऑगस्ट रोजी जम्बो हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे ऑक्सिजनची पातळी घटली. पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यावर जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऍम्ब्युलन्सच मिळाली नाही. या सर्व प्रकारात शेवटी त्यांची प्राणज्योत मावळली. व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे मृत्यूशी झुंज देत त्यांनी अखेरचा निरोप घेतला.
बातमी देणार्याची व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे मृत्यूची बातमी होत असेल तर ही खूप खेदाची बाब आहे. याबाबत जाहिर निषेध करण्यात येत आहे. तरी या सर्व गलथान कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. रायकर यांच्या कुटुंबियांना कोविड योद्धा म्हणून तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
रायकर हे गेली १५ वर्षं पत्रकार म्हणुन ईटीव्ही मराठी, एबीपी माझा नंतर ते टीव्ही 9 मराठीला पुणे प्रतिनिधी म्हणून नियुक्त होते. पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव