वाघोली, दि. ०३ सप्टेंबर २०२०: वाघोली येथील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वाघोली येथील बिजेएस शैक्षणिक स्कूलमध्ये प्रशासनाच्या वतीने केअर सेंटरमध्ये वाघोली गावातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवण व पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
सकाळी नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण उशिरा येत असल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागते. जेवण आले तरी त्याची गुणवत्ता फारशी ठीक नसते. पाण्यासाठी देखील काही वेळा थांबावे लागते. येथील डॉक्टरांकडून वेळेवर गोळ्या औषधे व वैद्यकीय सेवा मिळत आहे.
परंतु रुग्णांच्या तक्रारी वाढल्या असून संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे असे बिजेएस कोविड सेंटरमधील रुग्णाने सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे