राजस्थान, ४ सप्टेंबर २०२०: दाैसा जवळील भांडारेज टेकडीवर पाय घसरल्याने एक माणूस २० फूट खोल कोरड्या विहिरीत जाऊन पडला , चार दिवस पाणी आणि अन्नाविना तो जीवित होता. ही विहीर निर्जन ठिकाणी असल्यामुळे कोणाचेही लक्ष याकडे गेले नाही, जसोटा येथील रहिवासी महेंद्रकुमार बावरीया (वय २५) यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी रस्त्यावर पाणी साचल्याने रात्री मी लाकडाच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेने जात असताना माझा पाय घसरला आणि मी २० फूट खोल कोरड्या विहिरीत जाऊन पडलो.
निर्जन जागा असल्यामुळे सदर तरुण पडल्याची माहिती ग्रामस्थांना नव्हती. गुरुवारी सकाळी दिगंबर कॉलेजजवळ राहणाऱ्या शिल्पकारांचे कुटुंब घराच्या छतावर गेले असताना त्यांना विहिरीतून आवाज आला आणि त्यांनी आसपासच्या लोकांना याची माहिती दिली व पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तो तरुण स्वस्थ आहे आणि तो म्हणाला की तो कुटुंबासमवेत जसोटा येथील शेतांची देखभाल करतो.
लोकांना आश्चर्य वाटले कि हा चार दिवस न खाता पिता कसे काय जीवित आहे. तर डॉक्टरने या मागचे कारण सांगितले कि रिजर्व चर्बीमुळे शरीराला एनर्जी मिळत होती आणि सद्या दमट वातावरण असल्यामुळे तहानही कमी लागते. एसएमएस रुग्णालयाचे डॉ राजेंद्र कसाना आणि दौसा रुग्णालयाच्या डॉ.ज्योती मीणा यांनी सांगितले की, या तरूणाच्या त्वचेची आणि लघवीची तपासणी केल्यावर आरोग्याची जास्त माहिती मिळेल.
न्युज अनकट प्रतिनिधी: संदिप राऊत