नाशिकचा निरोप घेताना विश्वास नांगरे-पाटील झाले भावूक

9

नाशिक, दि. ४ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्रातील चर्चेत राहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे विश्वास नागरे पाटील. २६/११ च्या हल्ल्यात दमदार कामगिरी करणारे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे सध्या नाशिकमध्ये कार्यरत असून त्यांची देखील बदली करण्यात आली आहे.
नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील जड अंतकरणाने नाशिकरांना निरोप देऊन मुंबईला रवाना झाले आहेत. नाशिकचा पदभार सोडताना त्यांनी जनतेसाठी एक ओडियो मेसेज माध्यमातून भावना व्यक्त केल्या. दिड वर्ष सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते हे सर्व करताना भावनिक झाले होते.
विश्वास नांगरे-पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुवव्यवस्था विभागाच्या सह आयुक्तपदी निवड झाली असून नाशिक मध्ये त्यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी