लोणी काळभोर, दि. ४ सप्टेंबर २०२०: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र ०९ वरील कदम वाकवस्ती ते लोणी काळभोर कॉर्नर पर्यंत चारपदरी महामार्गाचा सर्व्हिस रोडवर सहाचाकी, व चारचाकी, मोठे ट्रक पार्किंग म्हणुन रात्रंदिवस उभे असल्याने जोड रस्त्यावरून महामार्गवर येणाऱ्या वाहनाना वाहने दिसत नसल्याने सर्व्हिस रोडवरील अवैध पार्किंग अपघातास निमंत्रण देत असल्याने कदम वाकवस्ती हद्दीतील सर्व्हिस रोडवर उभ्या गाड्यामुळे आता पर्यंत बरेच अपघात झाले आहेत.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कदम वाकवस्ती टोल नाका, ते बँक ऑफ महाराष्ट्र, एच पी पेट्रोल कंपनी, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, पर्यंत असलेल्या अपुऱ्या सर्व्हिस रोडवर सहाचाकी व चारचाकी च्या वाहनाच्या उभ्या रांगा लागलेल्या असल्याने महामार्गावरून जोड रस्त्याला वळताना किवा पेट्रोल पंपातून रस्त्याला वळताना सामोर एकाएकी वाहन येऊन अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे .
सर्व्हिस रोडवर दिवसरात्र रांगाच रांगा लागलेल्या असल्याने दररोज छोटे-मोठे अपघात होतच असुन यामुळे नागरिकांना व वहन चालकाला जिव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे महामार्ग पोलीस व वाहतुक पोलीसांनी महामार्गाचा सर्व्हिस रोडवर होणाऱ्या उ़भ्या गाड्याच्या रांगा, व होणारे अपघात थांबविण्याच्या दुष्टीकोन लक्षात घेऊन जातीने कार्यवाही करावी. अशी परिसरातील नागरिक, प्रवाशी यांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा कारवाई झाली नाही अशी खंत व्यक्त केली आहे.
पुणे- सोलापूर रोडवर युनियन बँक ते लोणी स्टेशन समोरील सर्व्हिस रस्त्यावर गाड्या पार्क होत असल्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचे हाल व रस्त्यावर अतिक्रमण करून गाड्या पार्क केले जातात यात संबंधित प्रशासनाने लक्ष घालून अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. व सर्व्हिस रोडवर गाड्या लावणाऱ्या गाड्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे