ठाणेकरांनो सावधान! आता मॉलमध्ये जाण्यासाठी आधी चाचणी मगच प्रवेश

10

ठाणे, ४ सप्टेंबर २०२०: ठाणे महानगपालिकेने बुधवार पासून ठाण्यतील मॉल सूरू करण्यास परवानगी दिली होती . ठाण्यातील सर्व मॉल हे नागरिकांसाठी सर्व नियम पाळून खूले करण्यात आले, मात्र एक दिवसातच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कोरोना पॉझिटिव सापडला त्यामुळे आता या ठाण्यातील मॉलमध्ये अँटीजन चाचणी केली जाणार आहे.

टीएमसीचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले की, “ठाण्यातील प्रत्येक मॉलला टीएमसीकडून अँटीजन चाचणी किट उपलब्ध करुन देण्यात येतील आणि ग्राहकांची तसेच मॉलच्या कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यासाठी एक पथक उपस्थित असेल. “त्याचप्रमाणे आजपासूनच ठाण्यातील विवियाना मॉलच्या आवारात शिबिर घेण्यात आले. पालिकेने आधी मॉलमधील १३८ कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली. त्यापैकी एक कर्मचारी पॉझिटिव सापडला.

ठाण्यातील कोरम, विवियाना आणि इतर मुख्य मॉल सुरु झाले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क सक्ती असे सर्व निर्देश पाळण्याची हमी मॉल व्यवस्थापकांनी दिली आहे .तरी देखील पालिकेने मॉलच्या आवारातच अँटीजन चाचण्यांसाठी शिबिर सुरु केले आहे. आधी चाचणी मगच मॉलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाकडून ऑगस्टपासून राज्यभरात मॉल्स पुन्हा सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती, मात्र सुरक्षेच्या हेतूने हे सर्व मॉल बंद होते. अखेर २ सप्टेंबरपासून मॉल्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे