सीटूचे जेष्ठ नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांचे कोरोनाने निधन

औरंगाबाद, दि.५ सप्टेंबर २०२०: सीटूचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उपाध्यक्ष , आणि कामगार चळवळीतील लढाऊ नेते काम्रेड ऊध्दव भवलकर यांचे आज कोरोना आजारामुळे निधन झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात, मराठवाड्यात सीटू संघटना मजबूत करण्यासाठी व कामगार चळवळ धारदार बनवण्यासाठी कॉम्रेड भवलकर यांचे योगदान लक्षणीय होते .ते लढाऊ कामगार नेते होते. शेतकरी- कामगार- शेतमजूर यांची एकजूट झाली पाहिजे यावर त्यांचा भर होता.

सीटू कामगार चळवळ व डाव्या चळवळीची फार मोठी हानी झाली आहे.

त्यांचे अंत्यसंस्कार औरंगाबाद येथे करण्यात येणार असून अंत्यसंस्काराच्या वेळेला फक्त चार नातेवाईक किट घालून स्मशानभूमीत प्रवेश करू शकतील.

स्मशानभूमीच्या बाहेर फक्त ५० व्यक्तींना येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा