जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर मधील शोपियनमध्ये दहशतवाद्यांनी एक सरकारी शाळेला पेटवून दिल्याची घटना सूत्रांनी दिली. रविवार (दि.३)पासून या शाळेची बोर्डाची परीक्षा सुरु होणार होती.त्या अगोदरच दहशतवाद्यांनी शाळा पेटवून दिल्याने यामुळे परिस्थिती पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जम्मू काश्मीर मधील परिस्थिती सामान्य होत असतानाच हा दहशतवाद्यांनी केलेले कृत्य निंदनीय असे आहे.