डोंबिवली , ८ सप्टेंबर २०२० : राज्यातील गडकिल्ले हे सध्या चांगल्या परिस्थितीत दिसत नाहीत , या गड किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे , कुठे मंदिराचे बूरूज तूटले आहेत तर कुठे गड चढणाऱ्या पायऱ्या व्यवस्थित नाहीत त्यामुळे यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे . मात्र गडकिल्ल्याच्या दूरूस्तीसाठी आता काही तरूण सरसावले आहेत . यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिलीतील आमदार राजू पाटील यांनी या तरूणांना ५ लाखांची मदत केली आहे .
गडकिल्ले हे काही प्रमाणात खचले आहेत मात्र पुढच्या पिढीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती समजावी यासाठी हा प्रयत्न या तरूणाकडून केला जात आहे . मात्र त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काम पुढे कसे घेऊन जायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता . सध्या या तरूणांनी प्रतापगडाच्या डागडूगीचे काम सूरू केली आहे . हे काम ही तरूण मंडळी लोक वर्गणीतून पूर्ण करणार असल्याचे सांगितले जाते . यासाठी डोंबिवलीचे आमदार राजू पाटील यांनी या तरूणांना ५ लाखांची मदत केली आहे .
त्यामुळे या तरूणांना काही प्रमाणात हातभार लागला आहे . लवकरच गडाच्या डागडूगीचे काम सूरू करणार असल्याचे ही या तरूणांनी सांगितले . तसेच हे काम लोकनिधीतून होणार असल्याने अनेकांनी या कामात आपला खारीचा वाटा उचला आहे . अनेकांनी आपल्याला होईल त्या प्रमाणे या सत्कर्मासाठी आपली मदत केली आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे