मोदीं सरकारला सपाचे ९ वाजून ९ मिनिटांचे प्रति उत्तर

नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२०: कोरोनामुळे सर्व प्रथम लॉकडाऊन झाल्यानंतर मोदी सरकारने टाळ्या व थाळी नाद केला नंतर ९ वाजता घरातील लाईट बंद करून दिवे लावण्यास सांगितले होते. त्याला आता राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) बुधवारी ९ वाजता ९ मिनिटांसाठी लोकांना घराचे दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आणि मेणबत्त्या, टॉर्च इ लाण्यास सांगितले . राजदच्या या मोहिमेला काँग्रेस, सपाचा पाठिंबा मिळाला आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मेणबत्ती लावून केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. त्याचवेळी आरजेडीच्या या मोहिमेवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे.

तसेच सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केले की आज त्यांनी भविष्यात होणा-या बदलांचा इतिहास लिहिला आहे. राजकारणाच्या आकाशावर प्रकाशाने क्रांती लिहिली आहे. अखिलेश पुढे लिहितात की आज तरुणांनी भाजपाच्या कारकिर्दीची उलटी गिनती सुरू केली आहे. आम्ही तरूणांसाठी नेहमीच मेणबत्त्या पेटवून त्यांचे समर्थन केले आहे आणि देत राहू.

यापूर्वी अखिलेश म्हणाले की, तरुण व त्यांच्या कुटुंबियांच्या बेकारी आणि बेरोजगारीच्या या अंधारात आपण आज रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे लावून क्रांतीची मशाल पेटविली पाहिजे, त्यांच्या आवाजात आवाज मिळवूया .

त्याच वेळी प्रियंका गांधींनी लिहिले की देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. त्यांच्या रखडलेल्या भरती, परीक्षांच्या तारखा, नवीन नोकऱ्यांची अधिसूचना, योग्य भरती प्रक्रिया आणि अधिकाधिक नोकऱ्यांमध्ये सामील होण्याची गरज आहे. त्या बदल्यात सरकारची कोरी भाषणे या बाबींकडे दुर्लक्ष करते. हे असे कधी पर्यंत?

मंगळवारी आरजेडीने ट्वीट करताना सांगितले की, बिहारमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. ती जर दुर करायची असेल तर घरातील दिवे बंद करून कंदील,मेणबत्ती किंवा दिवा लावू या बरोजगारी विरूद्ध आणि प्रकाश निर्माण करा . झोपेतून या अहंकारी सरकारला जागृत करणे, ज्वलंत मुद्दे उपस्थित करणे ही बिहारची सर्वात मोठी सेवा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा