माढा, ११ सप्टेंबर २०२०: दहिवली तालुका माढा येथील १०२ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली. इच्छाशक्ती व प्रतिकार शक्ती याच्या जोरावर या आजोबांनी सहज मात केली. १०२ वर्षे वयाचे झाले असताना देखील हे आजोबा आजही शेतात खूप कष्ट करतात. यामुळे त्यांचे शरीर सुदृढ तर आहेच परंतु, अजूनही आजोबांना कोणत्याही प्रकारचा रोग म्हणजेच मधुमेह, ब्लडप्रेशर, दमा अशा प्रकारचा आजार नाही.
त्यामुळे त्यांची प्रकृती ठणठणीत असून ह्युमिनीटी पावर स्ट्रॉंग असल्याने या आजोबांनी कोरोना सहज मात करून आजच्या तरुणांना कोरोनाला न भिता सामोरे गेल्यास काही होत नाही अशा प्रकारचा संदेशच दिला आहे.
संपूर्ण माढा तालुक्यात आजोबांनी या वयात कोरोनावर मात केलीच कशी यावर चर्चा रंगताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी आजोबांना अशक्तपणा जाणवायला लागला. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनां कोरोना बाधित लक्षणे आढळली त्यावेळी कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले. हे आजोबा पॉझिटिव निघाले. २८ ऑगस्टला कुर्डूवाडीतील संकेत मंगल कार्यालयातील कोवीड सेंटरमध्ये आजोबांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. केअर सेंटरमध्ये डॉक्टरांनी घेतलेली विशेष काळजी तातडीने केलेले उपचार व सर्व सोयी व सुविधांची उपलब्धता यामुळे व आजोबांची इच्छाशक्ती व प्रतिकार शक्ती यांच्या जोरावर आजोबा बरे झाले.
डिस्चार्ज दिल्यानंतर केअर सेंटर मधून घरी जाताना आजोबांना रुग्णांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील