ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाकडून दंड

मुंबई, १२ सप्टेंबर २०२० : ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर जास्त केल्यामुळे त्यांच्याकडून दंड घ्यावा असे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

प्लास्टिकचा अधिक वापर करत या कंपन्यांनी पर्यावरण विषयक नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यांचं पर्यावरणासंबंधी लेखापरीक्षण करावं तसंच यावर काय कारवाई केली त्याचा अहवाल १४ ऑक्टोबरपूर्वी इ मेलद्वारे पाठवावा असं हरित लवादानं सांगितलं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं आपल्या आधीच्या अहवालात कायद्याची अंमलबजावणी न करण्याची काही कारणं दिली आहेत.

मात्र मंडळानं स्वतः तसंच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीनं प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस उपायांचा उल्लेख या अहवालात नाही असं राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. को. गोयल यांनी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा