हे कृत्य भाजपचा खरा चेहरा दाखवते: सीताराम येचुरी

नवी दिल्ली, १३ सप्टेंबर २०२०: दिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचं नाव येताच त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला केला आहे. सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं दिल्ली पोलिसांना विरोधी पक्षांना लक्ष करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, मोदी व भाजपचा हा खरा चेहरा, चारित्र्य, युक्ती आणि विचारसरणी आहे. या सरकारचा नक्कीच विरोध केला जाईल.

दिल्ली दंगलींशी संबंधित दिल्ली पोलिसांनी अलीकडेच अतिरिक्त आरोपपत्र दाखल केलं आहे. दिल्ली पोलिसांच्या या आरोपपत्रात सीताराम येचुरी, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, प्राध्यापक अपूर्वानंद, अर्थशास्त्रज्ञ जयती घोष, चित्रपट निर्माते राहुल रॉय आणि इतर अनेकांची नावं आहेत.

विरोधी पक्षांच्या प्रश्नांना घाबरत आहे सरकार

सीपीएमचे माजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आरोपपत्राच्या नावावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ट्विट केलं की, “दिल्ली पोलिस भाजपच्या केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. त्यांच्या या बेकायदेशीर आणि अवैध कृत्यामुळं भाजपाच्या वरिष्ठ राजकीय नेतृत्त्वाचं वैशिष्ट्य प्रतिबिंबित होतं, त्यांना विरोधी पक्ष्यांच्या प्रश्नांची आणि शांततेत निदर्शनांची भीती वाटते आणि सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षांना रोखण्याचं काम ते करत आहेत”

असंवैधानिक धोरणांचा आणि असंवैधानिक उपायांचा विरोध कायम राहील

कॉम्रेड येचुरी यांनी ट्वीट केलंय की हे मोदी सरकार केवळ संसदेत प्रश्नांना घाबरत नाही, तर पत्रकार परिषद घेण्यास आणि आरटीआयला उत्तर देण्यास घाबरत आहे, ते मोदींचे वैयक्तिक फंड असोत किंवा त्यांची पदवी दाखवण्याचा मुद्दा असो. या सरकारच्या सर्व असंवैधानिक धोरणं आणि असंवैधानिक उपायांचा विरोध कायम राहील.

विषारी भाषणांवर कारवाई का नाही

दिल्ली दंगलीचा संदर्भ देताना सीताराम येचुरी यांनी ट्वीट केलं की, “दिल्लीतील हिंसाचारात ५६ लोक मरण पावले. विषारी भाषणाचा व्हिडिओ आहे, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? कारण सरकारनं विरोधी पक्षांना लक्ष करण्याचे आदेश दिले आहेत, मग त्यासाठी काहीही करायची गरज भासली तरी चालेल. मोदी आणि भाजपचा हा खरा चेहरा, चारित्र्य, युक्ती आणि विचार आहे. याचा विरोध केला जाईल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा