कंगनाचे अनधिकृत घर मुंबई महानगरपालिकेने पाडले आहे. असे अनेक सिने कलाकारांची बांधकामे मुंबई महानगरपालिकेने पाडली आहेत. यात विशेष काय ? आणि या कारवाईने त्यांना काहीही फरक पडत नसतो.
इथे सामान्य माणसाच्या चहाच्या टपऱ्या, वडा पावच्या गाड्या, फळांचे स्टॉल, कपड्यांच्या हातगाड्या, पाणी पुरीचे स्टॉल, फळ भाजी विकणाऱ्याचे ताडपत्री गाळे, फुटपाथवर उभे राहून हार विकणारे, नारळ पाणी विकणारे यांच्यावर रोज कारवाई होते. रोज यांना रस्त्याने महापालिकेचे लोक आले की हातगाडी घेऊन पळावे लागते. रोज यांच्या गाडया महापालिकेचे लोक उचलून नेतात. ताडपत्री गाळे तोडतात.
यासाठी तुम्हाला राज्यपाल भेटायला वेळ देतील का ???
अर्थातच नाही… मग आता एक गोष्ट सांगतो. तुमच्यावर जी कारवाई होते ना ती सो कॉल्ड कंगना रणावत सारख्या पांढरपेशी लोकांकडून महापालिकेत सततच्या होत असणाऱ्या तक्रारींमुळे होते. माझा वैयक्तिक अनुभव आहे हा. आणि कित्येकांना तोंडावर झापवलं आहे मी. अगदी पुणेरी भाषेत…
अरे, तुमची समस्या काय ? तर कंगनाच घर पाडलं ही ???
अहो त्या कंगणाला न्याय द्यायला राज्यपाल आणि देशातील एक मोठा पक्ष उभा आहे. ती राज्यपाल महोदयांशी हसून संवाद करत होती. क्षेत्रीय कार्यालयात हसा बर असं तुम्ही तुमचा माल आणि गाडी सोडवताना… दहा वेळा हात जोडावे लागतात. दहा वेळा… पुढच सांगायला नको… उगाच जास्त लायकी दाखवायची सवय नाही मला…
तुम्हाला क्षेत्रीय कार्यालयात साधी हातगाडी सोडवण्यासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो. त्यातही त्यादिवसाचा सगळा माल वाया जातो. आणि त्या दिवसाचा धंदा नाही म्हणून लॉस वेगळा…
आता माझ्या काबाडकष्ट करणाऱ्या आणि कामगार बंधू आणि मित्रांनो, तुमचा महत्वाचा मुद्दा काय ? हे तुम्हीच ठरवा…
त्या कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई वर एक सिनेमा केला तर तिला खरेच झाशीची राणी बनवायला चाललो आहोत आपण. मग तसेतर तिने बिकिनी मध्ये पण शूटिंग केलं आहे. देहविक्री करणाऱ्या व्यक्तीचा देखील अभिनय केला आहे…
आता तुम्ही म्हणाल. ते प्रोफेशन आहे तिचे…. हो की नई ???
मग झाशीची राणी बनणे हे देखील प्रोफेशनचाच एक भाग आहे. करोडो रुपये कमावले आहेत त्यातून. कुठे फुकट व्याख्याने देत सुटली नाही कंगना. दिले असेल तर सांगा ???
मी कंगनाला जागेवर आणणार. परंतु तिचे मुद्दे उचलणाऱ्यांना देखील जागेवर आणणार. तुमच्या प्रश्नांची आठवण तुम्हाला करून देणार मी… बुडू देणार नाही सहजपणे…😊
सत्य आम्हा मनी, न्हवे गाबाळचे धनी.
देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे…
– पैगंबर शेख
(तुकाराम महाराजांचा फॅन)