अग्र्यातील मुगल संग्रहालय आता ओळखलं जाणार ‘छ. शिवाजी महाराज’ या नावानं

आग्रा, १५ सप्टेंबर २०२०: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुगल संग्रहालयाचं नाव बदलण्याची तयारी सुरू झालीय. आग्रा येथील मोगल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असं नाव दिलं जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा विभागाच्या आढावा दरम्यान हा निर्णय घेतलाय.

या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटमध्ये दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज या नावानं ओळखलं जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत.”

यापूर्वी, यूपी सरकारनं त्यांच्या जिल्ह्यातील एका रस्त्याचं नाव राज्यातील ११ शहीदांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागानं यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी केलीय. जय हिंद वीर पथ योजना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जाहीर केली. शहीदांच्या सन्मानार्थ या मार्गांवर मोठं आणि आकर्षक फलक लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिले होते.

ऑगस्टमध्ये योगी सरकारनं निर्णय घेतला होता की जसला-कांधला रोडचं नाव शामलीतील वीर चक्र प्राप्त झालेल्या शहीद स्क्वाड्रन लीडर मदनपालसिंग चौहान यांच्या नावावर ठेवलं जाईल. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मान्यता दिली. बर्‍याच वर्षांपासून या भागातील लोक ही मागणी वाढवत आहेत. मागणीची पूर्तता झाल्यानंतर शहीदच्या कुटुंबीयांनी यूपी सरकारचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा