पुणे, १५ सप्टेंबर २०२० : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ‘Covid 19 Brigade, Pune City Help Desk’ कर्वेनगर येथील स्वप्निल दुधाने यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे सज्ज करण्यात आला असून या उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी दीपक मानकर यांचा हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात आला. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून पुणेकरांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असून या माध्यमातून विविध पातळ्यांवर मदतीचा हात दिला जाणार आहे.
यावेळी कार्यक्रमासाठी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, महाराष्ट्र राज्य NCP डॉक्टर सेलच्या डॉ. सुनीता काळे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद तांबे, कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष नितीन कळमकर, माजी विधानसभा अध्यक्ष मिलिंद वालवडकर, कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष संतोष बराटे, बाळासाहेब म्होकर, मधुकर भगत, कोथरूड युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, युवती अध्यक्षा योगिता बावकर, ओबीसी सेल अध्यक्ष संतोष चव्हाण, कामगार सेल अध्यक्ष राजेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, माजी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, वैभव कोठुळे, नंदिनी पानेकर, नंदिनी बडदे, अंजिक्य दुधाने, किशोर शेडगे, ऋषिकेश कडु, अमित गोंडाबे व कोथरूड मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयाेजन कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने आणि कार्याध्यक्ष नितीन कळमकर यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.