इंजिनिअर दिन

12

आज (१५ सप्टेंबर) रोजी भारतात इंजिनिअर दिन साजरा केला जातो. आधुनिक भारतात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त अभियंता दिवस (Engineers Day) साजरा केला जातो

भारतातील प्रख्यात इंजिनिअर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० साली झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती ही अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते. ज्यावेळेस संशोधनाची साधनं अत्यल्प होती त्यावेळी मोक्षगुंडम यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर अनेक नवनव्या गोष्टी तयार केल्या. त्याकाळी ते भारतातील अत्यंत हुशार आणि कल्पक असे इंजिनिअर म्हणून ओळखले जायचे. आपल्या अनेक कल्पक गोष्टी त्यांनी सत्यात उतरवून देशासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी केलेल्या एकूण कार्याची भारत सरकारने देखील दखल घेत १९५५ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं.

दरम्यान, यंदा कोरोना संसर्गामुळे अनेक कार्यालये आणि आणि महाविद्यालयं अद्यापही बंदच आहेत. दरवर्षी अनेक कार्यालयात आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. पण यंदा त्याच जल्लोषात हा दिवस साजरा करता येणार नाहीये. पण असं असलं तरीही या दिवसाचं महत्त्व अजिबात कमी होणार नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा मित्रांना नक्कीच देऊ शकता.

अभियंता दिनाच्या शुभेच्छा!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा