सुरेश रैना याची अनुपस्थिती सीएसके साठी चिंताजनक – डीन जोन्स

दुबई, १६ सप्टेंबर ,२०२० : ऑस्ट्रेलियन संघाचा पूर्व क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी सी. एस.के संघातील खेळाडू सुरेश रैना याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळविणारा संघ सी. एस.के यांच्या आयपीएल सामन्यांची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध १९ सप्टेंबर पासून होत आहे. तसेच सुरेश रैना याची अनुपस्थिती चिंताजनक ठरू शकते असे वक्तव्य जोन्स ने केले आहे.

भारताचा सुरेश रैना आणि स्पिनर हरभजन सिंग या दोघांनीही व्यक्तिगत कारणामुळे आयपीएल मधून माघार घेतली आहे. जोन्स यांनी स्टार स्पोर्ट्स वर म्हटले,” सुरेश रैना याची अनुपस्थिती सी. एस.के संघासाठी चिंताजनक ठरू शकते. कारण सुरेश रैना हा आयपीएल मध्ये सर्वात जास्त धावा करण्याच्या बाबतीत टॉप ५ फलंदाजांच्या यादीत आहे. तो डावखरा फलंदाज असून तो स्पिन ही चांगला खेळतो. पुढे तो म्हणाला , सी. एस.के संघासाठी खेळणारे जास्तीत जास्त खेळाडू हे उजव्या हाताचे फलंदाज आहेत. तसेच सी. एस.के संघाला सुरेश रैना सारख्या डावखुऱ्या फलंदाजांची गरज आहे.”

ते पुढे हे देखील म्हणाले, “त्यांना डाव्या हाताच्या फलंदाजांची गरज आहे”. नाहीतर ते अडचणीत येऊ शकतात. विशेषतः जेव्हा ते लेग स्पिनर समोर खेळतील तेव्हा चेंडू हा लांब जाईल. या कारणाने एकतर सैम करण, जडेजा, ब्रावो नाहीतर ताहीर यांसोबत सी. एस.के ने मैदानात उतरावं. वॉटसन आणि धोनी खूप वेळा पासून मैदानात नाही उतरले आहेत. रैना आणि हरभजन सुद्धा संघात नाही आहेत. त्यामुळे फ्लेमिंग आणि धोनी यांच्यावर संपूर्ण संघाला एकजूट ठेवण्याची जबाबदारी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा