मेरठ १६ सप्टेंबर २०२० :जगभरात कोरोनाचे सावट आहे. अशातच आयपीएल सीजन १३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे देशातील युवा आणि क्रिकेट प्रेमी यांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.
मेरठ मधून ४ खेळाडूंची आयपीएल साठी निवड झाली आहे. त्यात भुवनेश्वर कुमार ,कर्ण शर्मा, प्रियम गर्ग आणि कार्तिक त्यागी यांचा समावेश आहे. तसेच या खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी मेरठकर उत्साहित आहेत.
१९ सप्टेंबर पासून यूएई मध्ये आयपीएल सुरू होणार आहे. याचा फायदा हा स्पोर्ट्स व्यापारी वर्गाला ही होणार आहे. स्पोर्ट्स सोबत जोडलेल्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , या वेळेस आयपीएल भारतात होत नाही , तरी सुद्धा भारतातील युवा पिढीला आयपीएलचे खूप जास्तच आकर्षण आहे.याचाच फायदा हा मार्केट मध्ये दिसून येतो आहे.
मेरठ मधील व्यापार दरवर्षी आयपीएल सीजन मध्ये १ करोडचा आकडा पार करत असतो.परंतु कोरोना असल्यामुळे व्यापरीवर्ग हवालदिल झाला आहे. यातच आयपीएल होत असल्यामुळे व्यापाऱ्यांना चांगली विक्री होईल असे वाटत आहे.
मेरठ मधील बनवण्यात आलेले क्रिकेटचे सामान यांना जगभरात मागणी आहे.याचा लाभ हा छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना होत असतो.
सुरजकुंड स्पोर्ट्स गुड्स व्यापार संघाचे अध्यक्ष आणि जेके एक्सपोर्टचे मालक अनुज सिंघल यांनी सांगितले ,” यंदा देशात आयपीएल होत नसेल तरी सुद्धा स्पोर्ट्स व्यापारासाठी आयपीएल हे खूप लाभदायक ठरू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे