टाटा कंपनी बनवणार संसदेची नवीन इमारत, ८६२ कोटींची लावली बोली

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२०: टाटा कंपनीला दिल्लीत नवीन संसद भवन बांधण्याचं काम मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी प्रारंभिक बोली जिंकली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’नं बुधवारी ८६१.९० कोटी रुपये किंमतीची नवीन संसद भवन बांधण्यासाठी बोली लावली. एल अँड टी लिमिटेड’नं ८६५ कोटींची बोली सादर केली होती.

टाटा कंपनीनं एका वृत्त वहिनीला सांगितलं की आम्ही अंतिम बोली नव्हे तर एल १ बिड जिंकली आहे. टाटा’नं यासाठी सुमारे ८६२ कोटींची किंमत नोंदवली आहे, तर एल अँड टी’नं ८६५ कोटीचा खर्च सांगितलाय.

बुधवारी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं (सीपीडब्ल्यूडी) आर्थिक बोली सुरू केली. यामध्ये टाटा प्रोजेक्ट लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांची बोली दिली तर लार्सन अँड टुब्रोनं ८६५ कोटींची किंमत सांगितली. टाटा’ची बोली कमी आहे, त्यामुळं टाटा यांना संसदेचे काम मिळेल हे जवळजवळ निश्चित आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनं नवीन इमारत प्रस्ताव

संसद भवन इमारत खूप जुनी झाली असून सुरक्षेच्या दृष्टीनं यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरक्षेच्या धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं संसदेची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय.

विद्यमान इमारतीजवळ नवीन संसद भवन तयार केलं जाईल. हे सेंट्रल विस्टा रीडेवलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत तयार केलं जाईल. एका अंदाजानुसार नवीन संसद भवनाचं बांधकाम येत्या २१ महिन्यांत पूर्ण होईल. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) च्या मते, नवीन संसदेची इमारत प्लॉट नंबर ११८ वर बांधली जाईल आणि ती पार्लिमेंट हाउस एस्टेटमध्ये असेल.

सीपीडब्ल्यूडीनं सांगितले की विद्यमान संसद आपलं काम सुरू ठेवेल आणि नवीन इमारतीचं बांधकाम देखील सुरूच राहील. यापूर्वी सीपीडब्ल्यूडीनं म्हटलं होतं की, संसद भवनची नवीन इमारत बांधण्यासाठी तीन बांधकाम कंपन्यांना आर्थिक बोली सादर करण्यास पात्र मानले गेले आहे. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), टाटा प्रोजेक्ट्स, शापूरजी पालनजी अँड कंपनीचा समावेश आहे. मात्र, आता टाटा प्रोजेक्ट ला जबाबदारी देण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा