पीसीआर चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत रूग्ण कोरोनाचाच ; महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभाग

मुंबई, १७ सप्टेंबर २०२० : कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो कोरोनाचाच रुग्ण आहे असं समजून त्यावर उपचार करण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसात कोरोनाचे अशा प्रकारचे रुग्ण वाढत असून दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

ही परिस्थिती लक्षात घेऊनच आता उपचार पद्धतीत बदल करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या असून सर्दी तापाची लक्षणं म्हणून त्या रुग्णांकडं दुर्लक्ष केलं जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा