बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

बारामती,१७ सप्टेंबर २०२०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून बारामती शहरातील वडुजकर इस्टेट येथील इस्कॉन शिक्षण संस्थेच्या परिसरात पर्यावरणाला पोषक असणाऱ्या वड , पिंपळ , कडुलिंब , चिंच अश्या ७० वृक्षांची लागवड करण्यात आली.

मागील वर्षी देखील मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कडुन वृक्षारोपण केले होते. या वृक्षांचे आज मोठया झाडात रूपांतर झाले आहे. बारामती शहर हे वृक्षांचे नंदनवन बनवायचे हा आमचा उद्देश असल्याचे सतीश फाळके यांनी यावेळी सांगितले. त्याच प्रमाणे पार्टी तर्फे बारामती तालुक्यातील कऱ्हाळे व काळखैरवाडी येथील ग्रामस्थांना सॅनिटायजर व मास्कचे वाटप करण्यात आले.

या वेळी बारामती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मामा कचरे, शहराध्यक्ष सतीशजी फाळके,पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गोविंदजी देवकाते,सुधाकर पांढरे ,नवनाथ मलगुंडे ,सचिन मलगुंडे , व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन नवनाथ मलगुंडे व सचिन मलगुंडे यांनी केले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा