बारामती, १९ सप्टेंबर २०२०: कोरोनामुळे तालुक्यातील जवळपास ४०० ज्युनिअर कलाकारांना काम मिळाले आहे. सगळ्यांना चांगल्या मानधनामुळे कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असताना देखील चांगले पैसे मिळाले. येथील हॉटेल व्यावसायिक, केटरींग व्यावसायिक यांच्या बरोबरच गेली सहा महिने वाहनांना भाडे मिळाले नव्हते, अशा अनेक वाहनांनाही भाडे मिळाले.
बारामतीत तालुक्यात वेबसिरीजचे शुटींग व्हावे यासाठी राहूल जगताप या तरुणाने धडपड केली. सोनी लाइव्ह या वाहिनीवर वेबसिरीज दिसणार आहे.भारत पाकिस्तान यांच्यातील सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत ही वेबसिरीज आहे. क्लिक फ्लिक या पाचगणीच्या कंपनीने ही सीरिज बनवली असुन त्यांना अपेक्षित जागा जगताप यांनी शूटिंगसाठी दिल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात जिथे बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत होते, त्याच काळात बारामती तालुक्यातील व्यवसायास मुंबईकरांनी शूटिंगच्या माध्यमातून हातभार लावला आहे. यामधून तालुक्यातील काम केलेल्या लोकांना एक कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
हॉटेल, केटरिंग, हेल्पर, ज्युनिअर आर्टीस्ट, स्थळभाडे असे मिळून बारामतीकरांना साधारण १ कोटींचा फायदा झाला आहे.एसओटी ( सर्जिकल स्ट्राईक टिम) या वेबसिरीजचे शुटींग ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान झाले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव