भारताला मिळालं मोठं यश, चिनी सीमेवरील सहा टेकड्यांवर कब्जा

लडाख, २१ सप्टेंबर २०२०: पूर्व लडाखमधील चीन सीमेवर भारतीय सैन्यानं गेल्या २० दिवसांत मोठं यश संपादन केलंय. गेल्या २० दिवसांत भारतीय लष्करानं चीनच्या सीमेवर सहा नवीन टेकड्या ताब्यात घेत पीपल्स लिबरेशन आर्मीच्या योजनांना विफल केलय. भारतीय सैन्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी चिनी सैन्याला या टेकड्या हस्तगत करायच्या आहेत.

सरकारच्या उच्च स्रोतांनी सांगितलं की, ‘आमच्या जवानांनी सहा नवीन मोठ्या टेकड्या ताब्यात घेतल्या असून यात मगर हिल, गुरुंग हिल, रेजांग ला राचाना ला, मोखपारी आणि फिंगर ४ रिज लाइनवरील सर्वात मोठी शिखरं आहेत.’

भारताची चीनवर वाढतीय पकड

या टेकड्या दक्षिणेकडून उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या यशामुळे सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट क्षेत्रात भारताला चीनपेक्षा एक आघाडी मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि चीन सैन्यामधील लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) लगत उंच भागावरील कब्जा करण्यावरून वाद २९ ऑगस्टनंतर सुरू झाले. हा वाद या गोष्टीसाठी सुरू झाला होता की, चीन’नं पँगोंग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरील थाकुंग भागाच्या दक्षिणेकडील उंचावरील भागांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.

चीनची योजना फोल ठरली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी चिनी सैन्याच्या डोंगर हस्तगत करण्याच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी पँगोंगच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापर्यंत किमान तीन प्रसंगी हवाई गोळीबार करावा लागला.

स्त्रोतांनी हे देखील स्पष्ट केलं की, ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉप टेकड्या एलएसीच्या चिनी भागात आहेत, तर भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलेल्या टेकड्या भारतीय हद्दीत एलएसीवर आहेत. भारतीय सैन्यानं टेकड्या ताब्यात घेतल्यानंतर चिनी सैन्यानं आपल्या संयुक्त ब्रिगेडची सुमारे ३,००० अतिरिक्त सैन्याची तैनाती केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा