पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील

“रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह आम्हाला पडतो आहे”

इतिहास घडवणाऱ्या व्यक्ती संकल्पित इतिहास घडण्यापूर्वीच इतिहासजमा होतात अशी इतिहासाची साक्ष आहे यालाही काही अपवाद असतात, ज्यांचा लौकिकाचा परिमल लोक समृद्धीचा गाभार्‍यात चिरकाल दरवळत असतो.असे काही माहात्मे अधून-मधून कधीकधी या भूतलावर अवतीर्ण होतात ,अशी जगावेगळी माणसं या भुतलावर जन्मावर येतात हे या जगाच भाग्यच म्हटले पाहिजे.

महाराने देव पाहिला तर तो बाटतो ,स्त्री जर शिकली तर ती दुर्वर्तनी होते .अशा प्रकारांमध्ये चाचपडणाऱ्या महाराष्ट्राला ज्ञानरूपी प्रकाश किरणांनी दिपवून टाकण्यासाठी कुंभोज येथील “पायगोंडा पाटील “आणि “गंगुबाई पाटील “या कर्तव्यनिष्ठ दांपत्याच्या पोटी आण्णांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ ला झाला.अस्पृश्यता जातिभेद यांनी काळवंडलेली मने या नरक यातना शिक्षणापासून कोसो दूर असणारे मागासवर्गीय त्यांची पिढ्यानपिढ्या यांची होणारी कुचंबणा दूर करण्याची सुरुवात होऊन त्यांची रहाटच मोडून टाकतात, अस्पृश्याला घरी जेवायला घेऊन जाण ,शिक्षणरूपी ज्ञानगंगा या समाजात कधीच पोहोचली नाही तिने “ज्ञानदेव घोलप” यासारख्या अस्पृश्याला शिक्षण प्रवाहात आणून आपलं पुरोगामित्व सिद्ध करण इतरांच्या शिक्षणाच्या काळजी घेणाऱ्या भाऊरावांच्या वडिलांच्या होणाऱ्या सततच्या बदल्या यांनी त्यांच्या शिक्षणाची हेळसांड झाली पण म्हणतात ना “दैव जाणिले कुणी “या उक्तीप्रमाणे कोणत्‍याही विद्यापीठाची डिग्री नसताना स्वतः विद्यापीठ बनवण्याचा त्यांचा प्रवास या भारतीयांना रोमांचित करतो.

या प्रवासात “मिस क्लार्क होस्टेल “कोल्हापूर ,राजाराम कॉलेज अशा ठिकाणी अनेक ठिकाणी ते प्रसंग त्यांच्या जीवनात घडत होते कोल्हापूर संस्थानाच्या राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याचा अण्णांना परीसस्पर्श झाला. भरभक्कम शरीरयष्टि लाभलेल्या कुस्ती आणि लाल मातीकडे धावू पाहत होती ,बोलायची ओघवती कला सहज सुंदर शब्दफेक राजबिंडा स्वभाव या त्रिसूत्रीच्या जोरावर किर्लोस्कर ,कुपर ,ओगले यासारख्या उद्योजकांची भरभराट करून देणारे भाऊराव उभा महाराष्ट्र पालता घालत होते या दुःखांच आज्ञानाच समुळ उच्चाटन करायचं असेल तर त्यांना एकमेव उपाय दिसू लागला होता शिक्षण… 4 ऑक्टोंबर 1919.

शिक्षण क्षेत्रातील पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला काले येथे पहिली शाळा स्थापन केले गेली. स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय आणि स्वातंत्र्य त्या चतुसुत्रीचा पाठपुरावा करण्यात आण्णांना भक्कम आधार होता त्यांच्या सहचारिणीचा कुंभोज सोहळावरण्या वातावरणात वाढलेली दागिन्यांनी मढवून गेलेली आदक्का स्वखुशीने लंकेची पार्वती होते, महारामांगांच्या मुलांना वाढवते म्हणून माहेर तुटल होतं अशातच पोटच्या मुलांच्या पेक्षा जास्त लळा या माऊलीन वसतिगृहातील मुलांना लावला होता. स्त्री आयुष्यभर अलंकाराला जपतात ते मंगळसूत्र माऊली हसत-हसत घाण ठेवतात.आण्णांच्या कार्यात सावलीसारखी उभी राहणारी रयत माऊली या प्रवासाला मध्येच सोडून जाईल याची कल्पना नसताना नियतीने एक डाव खेळला रयत माऊली तिच्या लेकरांना पोरक करून गेली.अण्णांचे काळीज दुभंगल,आण्णांचा त्याग ,मोठं पण शब्दात व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात अशा वेळी म्हणावंस वाटतं

“माय मरताना माय डोळे पुसे लेकरांचे ,
माझ्या माघारी ही करा लाड माझ्या वासरांचे,
नका कोलमडू देऊ सजलेल्या हा मांडव जरी करावा लागला माळरानात तांडव,
उद्या पाडव्याचा सण खाऊ घाला खोडतोड माझ्या लेकरांना,
जणू तळहाती फोड, जणू तळहाती फोड “

अण्णांनी घेतला आधार वहिनींच्या ध्यासाचा लेकरांची माय बनले अण्णा ,यातूनच रयत विस्तारू लागली बहरू लागली रयतेचा वटवृक्ष दिमागू लागला यातून रयतेची प्रगती होऊ होऊ लागली रयत शिक्षण संस्थेचा विस्तार पाहून डोळे दिपवून जातात यामागे पाठीवर अज्ञानाचा आणि कपाळावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून जन्मलेल्या अण्णा वहिनी चंदनासारखे झिजले. महाराष्ट्र मध्ये शिक्षणाचा बहर होत असताना ९ मे १९५९ रोजी हा आधुनिक शिक्षणाचा कीर्तनकार कधीही परत न येण्याचा प्रवासाला कायमचा निघून गेला निघाला पुण्यात्मान निघाला
“झोपडीच्या गलबत्यासाठी मानवतेचे पोवाडे गाणारा कर्मयोगी कर्मवीर निघाला…”

बहुजणांच्या शिक्षणाचा वटवृक्ष असणार्या
पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या
जयंती निमीत्त त्यांच्या स्मृतीस विनंम्र अभिवादन..

समीर सीता रामचंद्र मांढरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा