गौतम गंभीरने धोनीच्या खेळीबद्दल केले हे वक्तव्य…. जाणून घ्या संपूर्ण बातमी

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२०:पूर्व भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला आल्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघासमोर बलाढ्य असे २१७ धावांचे लक्ष्य होते. अश्यातच धोनी चे ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला येणे गंभीरला समजून नाही आले.

चेन्नई संघाकडून सैम करण, ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव हे ४,५ आणि ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरले. गंभीरच्या म्हणन्यानुसार महेंद्र सिंग धोनीला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर यायला हवे होते. आणि पुढे येऊ सामना सांभाळायचा होता.

ई.एस.पी.एन क्रिकइंफो च्या “टी- २० टाईम आऊट” शो मध्ये गंभीरने म्हंटले ,” खर सांगू तर मी आश्चर्यचकित झालो होतो. धोनी ७ व्या क्रमांकावर फलंदाजी साठी आला? ऋतुराज गायकवाड आणि सैम करण यांचे वरच्या ऑर्डरला खेळायला जाणे बनत नव्हते. धोनीने पुढे येऊन लीड करायला हवे होते. ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणे ते पण तेव्हा, जेव्हा आपण इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करत असतो. खेळ संपला होता, फैफ डू प्लेसी एकटाच मैदानात योद्ध्यासारखा झुंज देत होता”.

फैफ डु प्लेसी ने ३७ चेंडूत ७२ धावांची तुफानी खेळी केली आणि या खेळीत त्याने एक चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच धोनी ने १७ चेंडूत २९ धावा केल्या. टॉम करण याने टाकलेल्या शेवटच्या षटकात लगातार ३ षटकार मारले. परंतु तेव्हा सामना हातातून निसटून गेला होता. यावर गंभीर म्हणाला,” हा, तुम्ही धोनीच्या शेवटच्या षटकाबद्दल बोलू शकतात. परंतु खरे सांगू तर या धावांना काही एक अर्थ नव्हता .ते फक्त स्वतःसाठी केलेल्या धावा होत्या. यापेक्षा लवकर आऊट होऊन पविलियन मध्ये गेले तरी वाईट नाही. परंतु कमीत कमी पुढे येऊन लीड करायला हवं आणि संघाला प्रोत्साहन द्यायला हवं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा