दुबई, २४ सप्टेंबर २०२०: आयपीएल २०२० यंदाच्या वर्षी खूप उशिराने सुरू करण्यात आली आहे. कोरोना असताना सुद्धा आयपीएलचे सामने खेळवले जात आहे. १९ सप्टेंबर २०२० पासून आयपीएलचे नियमित सामने सुरू झाले आहेत. परंतु यंदा आयपीएलच्या खेळाडूंवर जणू दुखापतीचे ग्रहनच लागले आहे.
सनरायझर्स हैद्राबादच्या मिशेल मार्शला दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. यातच आता चेन्नई सुपर किंग्जला देखील मोठा धक्का बसला आहे. या सत्रात स्टार स्पिनर हरभजन सिंग आणि महत्वाचा फलंदाज सुरेश रैनाला ऐनवेळी घ्यावी लागलेल्या माघारीनंतर आता चांगल्या लयीत असलेल्या अंबाती रायडूला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. मुंबई विरुद्ध झालेल्या पाहिल्या सामन्यात हिरो ठरलेल्या अंबातीला दुखापत झाल्याने चेन्नईच्या चिंतेत वाढ झाली आहे.
याआधी राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यात देखील अंबाती खेळू शकला नव्हता. यानंतर त्यांच्या पुढील खेळाबाबत चाहत्यांमध्ये मोठी संभ्रमता निर्माण झाली आहे. यावर सी.एस.के च्या सीईओंनी महत्वाची माहिती दिली आहे. रायडुला झालेली दुखापत जास्त गंभीर नसून सद्या तो हेमस्ट्रिंग इंज्युरीचा सामना करत आहे.
प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल की रायुडू पुढील सामने खेळणार आहे की नाही? मात्र रायडू सद्या दुखापतग्रस्त असला तरी त्याची इंज्युरी गंभीर नसल्याने तो आणखी एक सामना खेळू शकणार नाही. मात्र यानंतर तो अधिक जोमाने मैदानावर खेळण्यासाठी उतरेल असा विश्वास संघाच्या सीईओंनी व्यक्त केल्याने आता चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे