बिहार, २५ सप्टेंबर २०२०: २०२० च्या बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोविड कालावधीत निवडणुका तीन टप्प्यात घेण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील निवडणूक २८ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे, तर दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला आणि तिसरा टप्पा ७ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकांचे निकाल १० नोव्हेंबरला जाहीर केले जातील. या वेळी विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. २८ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, ३ नोव्हेंबरला दुसर्या टप्प्यात मतदान होईल आणि ७ नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यात मतदान होईल. १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
बिहार विधानसभा निवडणूक पूर्ण वेळापत्रक
निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यात आणि ७१ जागांवर निवडणुका. दुसर्या टप्प्यात १७ जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. दुसर्या टप्प्यात ९४ जागांवर निवडणूक होणार असून तिसर्या टप्प्यात १४ जिल्ह्यात ७८ जागा असतील. पहिल्या टप्प्यातील अधिसूचना १ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. नामनिर्देशनाची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसर्या टप्प्यातील अधिसूचना ९ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. नामनिर्देशनाची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर असेल. दुसर्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला होणार आहे. त्याचप्रमाणे तिसर्या टप्प्यातील अधिसूचना १३ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. उमेद्वारीची अंतिम तारीख २० ऑक्टोबर असेल. मतदानाचा शेवटचा टप्पा ७ नोव्हेंबरला आहे. यासह १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल येईल.
सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईलः निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, निवडणुकांच्या वेळी सोशल मीडियाचा वापर करणे देखील एक आव्हान आहे. जर कोणी सोशल मीडियावर समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
उमेदवारांची माहिती वेबसाइटवर द्यावी लागेलः निवडणूक आयोग
सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर असतील. उमेदवारांची माहिती वेबसाइटवर द्यावी लागेल. उमेदवारांवरील खटल्यांची माहिती सार्वजनिक केली जाईल.
यावेळी आभासी निवडणूक प्रचार: निवडणूक आयुक्त
उमेदवारी अर्ज भरताना दोनपेक्षा जास्त वाहने उमेदवार सोबत येऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. यावेळी आभासी निवडणूक अभियान होईल. मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत.
मतदानाच्या शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करतील: मुख्य निवडणूक आयुक्त
बूथवर केवळ एक हजार मतदार मतदान करू शकतील. मतदानाच्या शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होईलः निवडणूक आयोग
बिहार विधानसभा निवडणुकीत ७ कोटींपेक्षा जास्त मतदार आपली मते नोंदवतील. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन दाखल करता येतील. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. नामनिर्देशनही ऑनलाइन करता येते. विधानसभेच्या उमेदवारासह केवळ ५ लोक डोर टू डोर प्रचारात सामील होतील. ५ पेक्षा जास्त लोक घरात प्रचार करण्यास सक्षम नाहीत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, कोविडमुळे नवीन सुरक्षा मापदंडांतर्गत निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी होईल. एका बूथवर १ हजार मतदार असतील. ७ लाख हँड सेनिटायझर्स, ६ लाख पीपीई किट, २३ लाख हँड ग्लोबजची व्यवस्था केली आहे. ७ लाखांहून अधिक हँड सॅनिटायझर्स आणि ४६ लाखाहून अधिक मास्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे: निवडणूक आयोग
बिहारमध्ये एकूण २४३ जागांवर निवडणूक लढवायची आहे. कोरोना काळात पहिली मोठी निवडणूक होणार आहे. निवडणूक हा नागरिकांचा लोकशाही हक्क आहे. त्यामुळे निवडणुका घेणे आवश्यक आहे. यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे असतील.
लोकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी पूर्ण काळजी घेतली जाईल
कोरोना कालावधीत लोकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. निवडणूक आयोगाने यासाठी बरीच तयारी केली आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक कार्यक्रमही आखला गेला आहे.
निवडणुकीत कोविड प्रोटोकॉल पाळावा लागेल
कोरोना संकटानंतरची ही देशातील पहिली निवडणूक आहे, त्यामुळे निवडणूक आयोगानेही कोविड प्रोटोकॉलनुसार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मतदान केंद्रांची संख्याही दीडपटांपेक्षा जास्त वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्राची संख्याही वाढविण्यात आली आहे, तर प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या कमी करण्यात आली आहे.
सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मास्क व सेनिटायझर्स वापरण्यास सांगितले गेले आहे, परंतु प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, हैंडफ्री सेनेटाइजिंग व शरीर तापमान मोजण्यासाठी खबरदारीची व्यवस्था केली जात आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी बूथचे पूर्णपणे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे