पेढे उत्पादकांवर कोरोना महामारीमुळे संक्रांत

धाराशिव, २६ सप्टेंबर २०२० : कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक देवस्थाने सध्या बंद असल्याने मंदिराबाहेर विकल्या जाणा-या पेढे विक्रेत्यांवर व पेढा उत्पादकांवर संक्रांत आली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार पेढा विक्रेत्यांसह हजारो दुग्ध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. याचा मोठा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पेढा उत्पादन हे भूम तालुक्यात घेतले जाते.

कुंथलगिरी येथील सुप्रसिद्ध पेढा हा राज्यासह परराज्यातील प्रमुख देवस्थान क्षेत्रांवर मोठ्या चवीने खाल्ला जातो परंतु, कोरोना व्हायरस मुळे महाराष्ट्रातील तुळजापूर, कोल्हापूर, सप्तश्रृंगी, त्रंबकेश्वर ,पुणे, शिर्डी, पंढरपुर तसेच परराज्याचे कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा येथील प्रमुख देवस्थानांजवळ देखील याला चांगली मागणी आहे. कोरोना व्हायरस मुळे भूम तालुक्यातील जवळपास २ ते २.५ हजार पेढा विक्रेते स्वगृही परतले आहेत.

पेढा विक्रीत घट झाल्यामुळे हजारो खवा व्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले पेढा विक्रेते, भट्टी कामगार, दुग्ध व्यवसायिक शेतकरी यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे या चिंतेत व्यापारी सापडले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा