शिमला ,२६ सप्टेंबर,२०२० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता अटल टनलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरिता हिमाचल प्रदेशला पोहोचणार आहेत. आणि दुपारी अडीच वाजता पुन्हा परतणार आहेत. मोदींसोबत केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर सुद्धा कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरिता शनिवारी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. ठरलेल्या कार्यक्रमानुसार, प्रधानमंत्री मोदी यांचे ४ जागी स्वागत केले जाणार आहे. प्रधानमंत्री सोलांग मध्ये जनतेला संबोधित करणार आहेत.
कोरोना असल्या कारणामुळे रॅली मध्ये १०० ते २०० लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या आयोजनाचे लाईव्ह प्रक्षेपण सर्व जिल्ह्यातील मुख्यालयांमध्ये एलईडी स्क्रीन वर दाखवण्यात येणार आहे. लाखो लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया आणि शासनाच्या वेब पोर्टल वर प्रक्षेपित होणार आहे.
प्रधानमंत्री सकाळी ९ वाजता पोहोचतील आणि तेथे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष विपिन परमार, शहरी विकास मंत्री सुरेश भारद्वाज, ग्रामीण विकास तसेच पंचायतीराज मंत्री वीरेंद्र कंवर उपस्थित असणार आहे.
साऊथ पोर्टल वर जलशक्ती मंत्री व राजस्व मंत्री महेंद्र सिंग ठाकूर तसेच शिक्षा आणि जनजातीय विकास मंत्री रामलाल मार्कंडेय, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री सरवीण चौधरी उपस्थित असणार आहेत.
नॉर्थ पोर्टल वर उद्योग मंत्री बिक्रम सिंह ठाकुर, वन मंत्री राकेश पठानिया उपस्थित असणार आहेत. भुंतर मध्ये विधानसभा उपाध्यक्ष हंसराज उपस्थित असणार आहेत. तसेच सोलंग मध्ये गाविंद सिंग ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरीता सुरक्षेचा काटेकोरपणे बंदोबस्त करण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे