बारामती, २६ सप्टेंबर २०२० : शहरातील नावाजलेल्या अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने तांदुळवाडी वेस चौक परिसर मध्ये पाच मेगा पीक्सल, सहा एम. एम. लेन्स असणारे सात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.त्यामुळे या भागात आता सतत तिसऱ्या डोळ्याचे लक्ष असणार आहे.
शहरात तांदुळवाडी वेस चौकातील अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाने चौकात मध्यवर्ती ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्यामुळे दुर्गा टॉकीज कडे जाणार रस्ता, मारवडपेठेतील रस्ता ,श्रावण गल्ली कडे जाणारा रस्ता तसेच टकार कॉलनी कडे जाणारा रस्ता सुरक्षित केला आहे.या चौकात मोठ्या प्रमाणात सराफी व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने आहेत.त्यांना देखील एका प्रकारे मंडळाच्या कॅमेरा मुळे संरक्षण मिळणार आहे.आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले यावेळी उपस्थित होते.
शहरातील इतर मंडळांनी देखील आपल्या वायफाट खर्च टाळून आपल्या भागात तांदुळवाडी वेस तरुण मंडळा प्रमाणे सी सी टीव्ही कॅमेरे बसवल्यास अनेक चुकीच्या गोष्टीला आळा बसेल व प्रशासनास मदत होईल असे आवाहन मिलिंद मोहिते यांनी केले. तर मंडळाचे काम उत्क्रुष्ट असल्याचे औदुंबर पाटील या वेळी म्हणाले.मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, मोहनशेठ पंजाबी,अविनाश भापकर,स्वप्नील शेळके, निलेश गायकवाड, प्रकाश पळसे,जयसिंग पवार,स्वप्नील भागवत, सुभाष शेठ सोमाणी, किरण इंगळे, ऍड रीतेश सावंत,अमजद बागवान ,राहुल जाधव,भाऊ सावंत,सौरभ राठोड, लल्लू ढवळे,असद बागवान,प्रशांत हेंद्रे,सोनू बामने,प्रकाश फडतरे,अमर लोहोकरे,संजय ढोरगे, हनुमंत इंगळे तसेच अनिताताई गायकवाड,शितलताई गायकवाड ,वंदना भंडारे,मंगल कुर्ले,मीना गोरे आदी महिला उपस्थित होत्या.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.