आंबेगाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कामगार व उत्पादन शुल्क मंत्री वळसे पाटील यांना निवेदन

आंबेगाव, २५ सप्टेंबर २०२०: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाली असली तरी आरक्षणामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना जे लाभ होणार होते ते सर्व निर्णय राज्याच्या मंत्री मंडळाने घेतले आहेत, मराठा समाजाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी राज्याच्या मंत्री मंडळाने घेतली आहे. अशी माहिती राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली.

आंबेगाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मंचर येथे मंत्री वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करून वळसे पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांशी चर्चा करताना मंत्री वळसे पाटील बोलत होते.

या आंदोलनात मराठा मोर्चाचे समन्वयक अजय घुले,दत्ता गांजाळे व त्यांचे सर्व मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा