मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: कोरोना संसर्गाच्या काळात शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयात सामान्य रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णांना एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील तब्बल अडीच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ८४ हजार कॅन्सर तर हृदयविकाराचा त्रास झालेल्या २९ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बारामतीत शहरात देखील या आरोग्य योजनेंतर्गत अनेक रुग्णांनवर उपचार करण्यात आले आहेत.
मार्च महिन्यांपासून कॅन्सर, गर्भवती महिला तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसह कोरोना संसर्गाच्या इलाजासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेने २३ मे पासुन या योजनेंतर्गत उपचार करण्यास सुरुवात केली. यापूर्वी पर्यंत पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो पांढरी शिधापत्रिका धारकांना देखील या योजनेत समावेश केल्याने राज्यातील तब्बल 12 कोटी लोक या योजनेचा लाभ घेतला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत फक्त ४४० रुग्णालयात व्यवस्था होती. ती वाढवून १००० रुग्णालयात एकूण ९९६ प्रकारच्या आजारांवर उपचार मिळत आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना सुरू असून कोरोनासह बाळंतपण १२० आजारांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
कॅन्सर रुग्णांचा एक मोठा वर्ग महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेत आहे. यामध्ये केमोथेरपी सह अन्य तापसण्यांचा लाभ ६७ हजार ५४७ रुग्णांनी घेतला तर ६ हजार ७०६ कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया, ९ हजार ८४७ रुग्णांवर रेडिएशन, २७ हजार २३८ रूग्णांवर हृदयविकार शस्त्रक्रिया, २ हजार ५२५ हृदयरुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकार,योजनेमुळे तब्बल ४४ हजार ३७८ किडनीच्या रुग्णांना उपचार मिळू शकले.
स्त्रियांच्या आजारावर २२ हजार ७३५ महिलांनी लाभ घेतला एकूण ९ हजार ३०७ लहान मुलांवर या योजनेत शस्त्रक्रिया केल्या. अपघात कारणांमुळे हाडं मोडलेल्या ६ हजार ३४९ रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ६ हजार २९२ सामान्य रुग्णांच्या शस्त्रक्रिया करोना काळात पार पडल्या. ३ हजार ५५८ मेंदुच्या शस्त्रक्रिया पाच महिन्यांत करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान ठरली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव