पुढच्या महिन्यात बँकांना असणा-या भरपूर सुट्ट्या, जाणून घ्या तारखा…

मुंबई, २९ सप्टेंबर २०२०: आता, देशभरात आर्थिक व्यवहार पूर्ण सुरू झाले आहेत, परंतु कोरोना संसर्गाचा धोका अजूनही कमी होताना दिसत नाही. म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीनं संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. यासाठी, आपण घरून काम हाताळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आवश्यकतेनुसारच बाहेर जाणं योग्य आहे. सामान्य लोकांच्या जीवनात बँकाही खूप महत्वाच्या असतात. परंतु, बर्‍याच वेळा असं घडतं की, आपण बँकेत जातो आणि त्यावेळेस समजतं की आज बँक बंद आहे. कोरोना साथीसारख्या संकटाच्या वेळी अशा प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी, बँका कधी बंद असतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे.

ऑक्टोबर महिन्याबद्दल बोलायचं झालं तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात १० उत्सव आहेत. या दहा दिवसांत देशाच्या विविध भागात बँका बंद असणार आहेत. याशिवाय आरबीआय’नं सन २०१५ मध्ये अशी घोषणा केली होती की, दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सार्वजनिक सुट्टी असंल. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये दर रविवारी बँकांना दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सार्वजनिक सुट्टी असेल. तर आता जाणून घेऊ या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या तारखांना बँका बंद राहतील.

आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, महात्मा गांधी जयंती ऑक्टोबर महिन्यात दोन तारखेला असल्यामुळं बँकांना देशभरात सुट्टी असेल. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी रविवार असल्यानं बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर १० ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि ११ ऑक्टोबर रोजी रविवार असल्यानं देशभरात बँका बंद राहतील. कटी बिहु / मेरा चौरन हौबा ऑफ लैनिंगथौ सनामाही यानिमित्ताने १७ तारखेला स्थानिक सुट्टी असेल. आसाम आणि इम्फालमधील बँका या दिवशी बंद राहतील. यानंतर, १८ ऑक्टोबर रोजी रविवारी असल्यानं देशभरातील बँका बंद राहतील.

२३ ऑक्टोबर रोजी महा सप्तमी आहे. या दिवशी त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि मेघालयातील बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर २४ ऑक्टोबरला महाष्टमी आहे. त्रिपुरा, आसाम, तेलंगणा, इम्फाल, जम्मू, कोची, पश्चिम बंगाल, बिहार आणि केरळमध्ये या दिवशी बँका बंद आहेत, परंतु चौथ्या शनिवार असल्यानं बँका देशभरात बंद राहतील. यानंतर २५ ऑक्टोबर रोजी रविवार असल्यानं देशभरात बँका बंद राहतील.

२६ ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. या दिवशी त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, जम्मू, कोची, पश्चिम बंगाल, बिहार, काश्मीर आणि केरळमध्ये बँकांना सुट्टी असेल. यानंतर, २७ आणि २८ रोजी दुर्गापूजेमुळं बँका सिक्कीममध्ये सुट्टीवर असतील. यानंतर २९ ऑक्टोबरला प्रेषित मोहम्मद जयंती आणि दुर्गा पूजेमुळं सिक्कीम, जम्मू, कोची, काश्मीर आणि केरळमध्ये बँका बंद असतील.

ईद-ए-मिलाद ३० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, इम्फाल, जम्मू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि काश्मीरमध्ये बँकांना या दिवशी सुट्टी असेल. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभ भाई जयंती आहे. या दिवशी गुजरात, कर्नाटक, ओरिसा आणि सिमला येथे बँकांना सुटी असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमा

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा