भारतीय संघाचा जलद गतीचा गोलंदाज अशोक डींडा झाला भाऊक

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर २०२०ः भारतीय संघाचा जलद गतीचा गोलंदाज अशोक डींडा याची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे पसरले आहे. आयपीएलमध्ये फलंदाज गोलंदाजांवर बरसत असतात आणि जास्तीत जास्त धावांचे विक्रम मोडत असतात. यंदा आयपीएल ही दुबई मध्ये होत आहे. शारजाहचे मैदान इतर मैदानापेक्षा छोटे आहे. आतापर्यंत झालेल्या १० सामन्यांत ८ सामने हे उर्वरित मैदानावर झाले आहेत आणि २ सामने हे शारजाहाच्या मैदनावर झाले आहेत. या २ सामन्यांत चक्क ६२ षटकार लगवण्यात आले आहे. अशातच गोलंदाजाचे जणु मरणच आहे. 

अशोक डींडा याने क्रिकपेडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मत मांडले.  त्यात तो म्हणाला, “सोशल मीडिया हे लोकांना प्रोत्साहन देण्याचं एक साधन आहे. ना की कोणाला कमी लेखण्याच आणि त्याचं करीयर संपवण्याच.” पुढे तो म्हणाला. “मला माहित आहे मी जगातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज नाहीये. परंतु जगाला खरंच माहित नाही आहे. मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. मी क्रिकेटर होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या कुटुंबानेही मला पाठिंबा दिला नाही. मी वेस्ट बेंगालसाठी रणजी क्रिकेट खेळण्यामागे माझी ९ वर्षाची मेहनत आहे. मी क्रिकेट मैदानावर अन्नाचा एक कण ही न खाता मैदानावर झोपून राहायचो. जर तुम्हाला मला साथ आणि पाठिंबा नसेल द्यायचा तर नका देऊ परंतु माझ्या खेळाला मागे टाकू नका. मलाच माहीत आहे. मी दिवस रात्र मेहनत घेतली आहे क्रिकेट खेळण्यासाठी.”

अशोक डींडा याची सोशल मीडियावर  क्रिकेट रसिकांकडून खिल्ली उडविली जाते. भारतीय संघाकडून खेळताना डींडा च्यानावे १२ एकदिवसीय सामन्यात १३ विकेट्स आहेत. आणि ९ टी- २० सामन्यात १७ विकेट्स आहेत. तसेच आयपीएल मध्ये ७८ सामन्यात त्याच्या नावे ६९ विकेट्स आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ११६ सामन्यात ४२० विकेट्स आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा