आज शनिवार दिनांक ०३/१०/२०२० रोजी मा.श्री.नगरसेवक हेमंतभाऊ रासने (स्थायी समिती अध्यक्ष पुणे.मनपा) यांच्या कडून कसबा विश्रामबागवाडा व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील एकूण १५०० आरोग्य सेवकांसाठी हॅन्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले.
या पूर्वी मा.हेमंतभाऊ रासने यांच्या कडून कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रत्येक आरोग्य सेवकास कोरोना किट साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
कोरोनाचा धोका अजून ही टळलेला नाही व सफाई कामगार नेहमीच नागरिकांचा संपर्कात येतो त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्याची काळजी घेत कामाचा ठिकाणी वापरण्यासाठी हॅन्ड ग्लोज वाटप पार पडले.
आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मा.सौ.गायत्रीताई खडके , मा.श्री.योगेशजी समेळ, मा.श्री.अजयजी खेडेकर, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.शंतनुजी गोयल साहेब, परिमंडल ०५ प्रमुख मा.श्री. अविनाशजी सपकाळ साहेब, मा.उपआयुक्त श्री.माधवजी जगताप साहेब ,महापालिका सहाय्यक आयुक्त श्री.अशिषजी महाडदळकर साहेब , वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिलजी मोहिते साहेब, अशोकजी बंडगर साहेब व सर्व आरोग्य निरिक्षक ,मोकादम व सेवक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; ज्ञानेश्वरी आयवळे