प्रयागराज मध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बीजेपी नेत्याला अटक

6

प्रयागराज, ४ ऑक्टोंबर २०२०: उत्तर प्रदेश हाथरस आणि बलरामपूर सामूहिक बलात्काराबद्दल सतत चर्चेत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली आहे. पीडित बीए विद्यार्थिनीनं जिल्ह्यातील कर्नलगंज पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हाथरस प्रकरणातील चर्चेमुळं खराब झालेली आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराजमधील सामूहिक बलात्काराचा आरोपी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी यांना अटक केली आहे.

याप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी आणखी एक आरोपी डॉक्टर अनिल द्विवेदी यांना तुरुंगात पाठविले आहे. यासंदर्भात पोलिसांनी आता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी यांना अटक केली आहे.

पीडित युवती एक विद्यार्थीनी असून बीए’चं शिक्षण घेत आहे. पीडित मुलीनं प्रयागराजमधील कर्नलगंज पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बलात्काराचा खटला लिहिल्यानंतर आरोपी भाजपा नेते डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी फरार होते. परंतु, पोलिसांनी शनिवारी भाजप नेत्याला अटक करण्यात यश मिळविलं.

महत्त्वाचं म्हणजे हाथरस घटनेमुळं, जेथे भाजपा बॅकफूटवर आहे आणि विरोधी पक्ष सातत्यानं उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता भाजपच्याच नेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामुळं भाजपची चिंता वाढली आहे. यापूर्वी उन्नावचे भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांनाही बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं गेलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा