इंदापूर, दि.५ ऑक्टोबर २०२०: इंदापूर शहरांमधील मुख्य रस्त्यांवर विद्युत वाहिनी टाकण्यासाठी मागील महिन्यात रस्ते खोदण्यात आले होते. मात्र या खोदलेल्या रस्त्यांमुळे अनेकदा लहान मोठे अपघात झाले आहेत.
शिवसेनेचे शहरप्रमुख महादेव सोमवंशी यांनी इंदापूर शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आणि एसटी त्यांच्यासमोर मोठे दोन खड्डे असून त्या खड्ड्यांमध्ये बरेच अपघात घडले आहेत. हे अपघात घडल्यानंतर कोणाचे गाडीचे नुकसान झालेले, कोणाला दुखापत झालेली आहे. शहरातील सत्ताधारी तसेच विरोधी गटाचे नगरसेवक देखील याच रस्त्याने दररोज ये-जा करत असतात. राज्यमंत्री दत्तामामा भरणे हेसुद्धा आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्या ठिकाणाहून ये-जा करत असतात. तरीपण त्यांनी कोणालाही आदेश दिलेला नाही की हे खड्डे बुजवून घ्यावे, म्हणून आज त्यांच्यावर इंदापूर शहर व तालुक्यातील शिवसैनिक सर्व मिळून त्यांनी आज तहसीलदार व पीडब्ल्यूडी ऑफिस येथे निवेदन दिले आहे. निवेदन दिल्यानंतर जर दोन दिवसांत त्याची दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिला आहे.
तसेच इंदापूर तहसील कचेरी त्याच्यासमोर मोठे खड्डे तयार झाले आहेत. तसेच एचडीएफसी बँक त्याच्यासमोर रोज लहान मोठे अपघात घडत असतात. तेथे पण बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले आहेत, जर त्याच्यावर दोन दिवसात नाही कारवाई झाली तर महादेव सोमवंशी यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दुर्वास शेवाळे, शाखाप्रमुख मंगेश जाधव, शाखाप्रमुख मेजर पवार, शाखाप्रमुख अवधूत पाटील यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.