पुण्यात दगडाने ठेचून कुख्यात गुंड शैलेश घाडगे याची हत्या

11

पुणे, ६ ऑक्टोबर २०२०: पुण्यात असलेल्या खराडी भागात काल कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शैलेश घाडगे असे आहे. हे प्रकरण खराडी स्थित नैवेद्यम हॉटेल शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ मारेकऱ्यांनी शैलेश घाडगे च्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. ही घटना पहाटे घडली असल्याची माहिती आहे.

दरम्यान मृत झालेल्या शैलेश घाडगे यावर सुद्धा अनेक गुन्हे दाखल होते. तसेच त्याचा खून कोणी केला आणि का केला याचे कारण अजून ही अस्पष्ट आहे. तसेच एकीकडे गुंडाच्या हत्येने थरकाप उडाला असताना, तिकडे पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ दिवसाढवळ्या गोळीबार पाहायला मिळाला. पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. एसबीआय ट्रेझरी कार्यालयासमोर हा फायरिंगचा प्रकार घडला. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे