शिक्षकाचा प्रामाणिक पणा

बारामती, ६ ऑक्टोबर २०२०: २९ सप्टेंबर रोजी भिगवण रोड वरील अजिंक्य बजारमध्ये खरेदीसाठी आलेल्या हेमंत धुमाळ यांना सोन्याचे मंगळसुत्र सापडलं, त्यांनी ते पोलिसांकडं नेऊन जमा केलं. धुमाळ हे पेशानं शिक्षक असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे शहरात सर्वत्र कौतुक होते आहे.

भिगवण रोडवरील अजिंक्य बाजारमधून खरेदी करून बाहेर आल्यावर विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस असलेले हेमंत धुमाळ यांना रस्त्यावर सोन्याचं मंगळसूत्र पडलं असल्याचं लक्षात आल्यावर धुमाळ यांनी ते सोन्याचं गंठण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जमा केलं. पोलीस स्टेशनकडुन व्हाट्सएप ग्रुपवर याबाबत सर्व शहरात माहिती देण्यात आल्यावर, आज मंगळवार रोजी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ओमासे यांनी हे मंगळसूत्र असलेल्या रेश्मा अंकुश धुमाळ या अजिंक्य बाजार शेजारील बँक ऑफ इंडियामध्ये कामानिमित्त आले असताना पडले असावे असा ( रा.लामजेवाडी ता.इंदापुर ) यांनी दावा केला.
     
सर्व शहानिशा व खात्री करून पंचांच्या समक्ष मंगळसूत्र धुमाळ यांच्या ताब्यात देण्यात आलं. सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गामुळं प्रत्येकजण आर्थिक अडचणीला सामोरे जात असताना धुमाळ यांच्या प्रमाणिकपणाचं शहरात सर्वत्र कौतुक होते आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा