पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकजण ठार, दोन गंभीर जखमी

दौंड, ६ ऑक्टोंबर २०२०: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी (ता. दौंड) हद्दीत पुण्याकडं भरधाव जाणारी मारुती स्विफ्ट गाडी पाठीमागून ट्रकच्या खाली घुसल्यानं अपघातात एक जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले.

खडकी (ता. दौंड) येथील काळभोर वस्तीजवळ महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याकडं भरधाव जाणारी स्विफ्ट गाडी (एमएच. १४ बी आर ५२२७) पाठीमागून समोरील ट्रकच्या (एमएच. २५ पी १२४७) खाली घुसली. अपघातात स्विफ्टच्या वरील बाजूचा चेंदामेंदा झाला.

त्यामुळं स्विफ्टमध्ये पुढे बसलेला एक जण जागीच ठार झाला. तर पाठीमागं बसलेले दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर मृत शवविच्छेदनासाठी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृत व जखमींची नावे व पत्ता समजू शकला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा