नवी दिल्ली, ७ ऑक्टोंबर २०२०: लडाखमध्ये चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याला लवकरच अमेरिकेनं बनवलेल्या प्राणघातक रायफल सिग १६ मिळवणार आहेत. देशातील नरेंद्र मोदी सरकारनं अमेरिकेतून ७२,५०० सिग सोअर असॉल्ट रायफल खरेदीस मान्यता दिली आहे. या संरक्षण करारामध्ये कोणत्याही प्रकारचा उशीर होऊ नये, म्हणून हे शस्त्र जलदगती प्रक्रियेअंतर्गत खरेदी केले जाईल.
चीन सीमेवर तैनात सैनिकांना मिळणार अमेरिकन रायफल
सरकारच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितलं की, या कराराच्या पहिल्या तुकडीत मिळालेल्या असॉल्ट रायफल जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना देण्यात आल्या. दुसर्या तुकडीत येणारी शस्त्रे चीनच्या सीमेवर पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या सैन्यांना पुरविली जातील.
विद्यमान इनसास रायफल्सच्या बदल्यात या नवीन रायफल खरेदी केल्या जात आहेत. या रायफल स्थानिक आयुध कारखान्यांमध्ये बनवल्या जातात. सरकारच्या योजनेनुसार तब्बल १.५ लाख आयात केलेल्या रायफल आतंकवादी विरोधात आणि सीमेवर तैनात सैनिक ज्यात एलओसी आणि एलएसी या दोन्ही देशांतील सीमेवर तैनात असणाऱ्या सैन्यानं दिल्या जातील.
अमेठीमध्ये देखील बनवणार एके २०३ रायफल
उर्वरित सैन्यातील जवानांना एके -२०३ रायफल पुरविल्या जातील. अमेठी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत या रायफल भारत आणि रशिया संयुक्तपणे तयार करतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे