बारामती, ८ ऑक्टोबर २०२०: बारामतीमध्ये सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असून मधुमेह तसेच ब्लड प्रेशर असणाऱ्या वृद्ध नागरिकांना रेमिडिसिव्हरची गरज पडत आहे. मात्र काही दुकानदार जास्त पैसे घेऊन इंजेक्शन देत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
कोरोना संसर्गाची बाधा झाल्यास रुग्णाच्या फुप्फुसात जर कफचे इन्फेक्शन असेल तर त्या पेंशन्टला रेमिडिसिव्हरचे इंजेक्शन द्यावे लागते आहे. यासाठी रुग्णाचे नातेवाईक रेमिडिसिव्हर हे इंजेक्शनची गरज लागत असल्याने ते काळ्या बाजाराने विकणा-या टोळी कडून जास्त पैसे देऊन विकत घेत आहेत. आता कंपनीच हे इंजेक्शन देणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. येत्या 2 दिवसात कंपनी स्वता: रुग्ण जिथे ॲडमिट आहे तिथे पाठवणार आहे.
यासाठी कोणताही जास्त आकार लावला जाणार नाही. यासाठी कंपनी टोल फ्री नंबर प्रदर्शित करणार आहे. ज्या रुग्णाला रेमिडिसिव्हर ह्या इंजेक्शनची गरज असेल त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल. यामुळे काळाबाजार होणार नाही असे समजले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव