मास्क खाली घेऊन बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अजित पवार भडकले

पुणे, ९ ऑक्टोबर २०२०: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आक्रमक व स्पष्टवक्तेपणा सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या भाषणाची नेहमी चर्चा होते. आज पुण्यातील एका प्रयोगशाळा वाहन उदघाट्नाच्या कार्यक्रमात पवार यांच्या स्वभावाचा अनुभव उपस्थितांनी घेतला.

सध्याच्या कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटायजर, मास्कचा वापर असे आवाहन शासनाकडून केले जात आहेत. उपमुख्यमंत्री पवार देखील त्यांच्या कार्यक्रम, बैठकांमध्ये या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. आज पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा या चारचाकी वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रयोग शाळेची माहिती देण्यासाठी तेथील कर्मचारी आल्यावर त्याने पवार यांच्याशी बोलताना तोंडाचा मास्क काढला यावर पवार यांनी संतापून त्याला मध्ये थांबवून ‘मास्क वर घे आणि मग बोल’ असे म्हणत त्याला चांगलेच फैलावर घेतले, यामुळे थोडा वेळ गोंधळाचे वातावरण झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा