भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे सुपुत्र जय अमितभई शहा यांच्या स्वामित्व असणारी कंपनीचा टर्नओवर हा नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाहा पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून १६००० पट वाढला आहे. ही बाब रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आर ओ सी ) ने कागदपत्र समोर आणल्यावर समजली.
कंपनीचा ताळेबंद व आरओसीच्या वार्षिक अहवालात असे दिसून आले आहे की शाह यांची टेंपल एंटरप्राइझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २०१३ आणि २०१४ च्या मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत आणि या पूर्ण वर्षांत कोणताही महत्त्वपूर्ण व्यवसाय करीत नसताना कंपनीचे अनुक्रमे ६२३० आणि १७२४ रुपयांचे नुकसान झाले तर २०१४-१५ मध्ये कंपनीला केवळ ५०००० च्या महसुलात १८,७२८ रुपयांचा नफा दाखविला. २०१५-१६ मध्ये कंपनीची उलाढाल आकस्मित रित्या वाढून ८०.५ कोटी रुपयांवर पोहोचली.
टेंपल एंटरप्राइजच्या महसुलात ही आश्चर्यकारक वाढ अशा वेळी झाली जेव्हा कंपनीला राज्यसभेचे खासदार आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ कार्यकारी परिमल नथवाणी यांच्या मालकीच्या वित्तीय सेवा कंपनीकडून १५.७८ कोटींचे असुरक्षित कर्ज मिळाले.
तथापि, एका वर्षा नंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये जय शाहच्या कंपनीने अचानकपणे त्यांचे व्यवसायाचे काम थांबवले. मागील वर्षातील १.४ कोटी रुपयांचे नुकसान आणि आधीच्या वर्षांत झालेल्या नुकसानीमुळे कंपनीची निव्वळ संपत्ती पूर्णपणे खालावल्याचे संचालकांच्या अहवालात म्हटले होते.
टेंपल एंटरप्राइझ मालमत्ता चढउतार
टेंपल एंटरप्राइझ २००४ मध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि जय शाह आणि जितेंद्र शहा यांना त्याचे संचालक म्हणून नेमण्यात आले होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पत्नी सोनल शाहचीही या कंपनीत भागीदारी होती.
२०१४-२०१५ मध्ये टेंपल एंटरप्राइझकडे कोणतीही निश्चित मालमत्ता नव्हती किंवा त्यामध्ये कोणतीही स्टॉक नव्हते. त्या कंपनीला ५,७९६ रुपयांचा आयकर परतावा देखील मिळाला. २०१४-२०१५ मध्ये या कंपनीचा ५०,००० रुपये महसूल झाला. परंतु २०१५-२०१६ मध्ये कंपनीची कमाई आश्चर्यकारकपणे वाढून ८०.५ कोटी रुपये झाली. यात १६ लाख टक्के वाढ झाली.
मागील वर्षी रिझर्व्ह आणि सरप्लस १९ दशलक्षांवरून ते ८०.५ लाखांवर घसरले आहे. मागील वर्षी जेथे त्याचे व्यवसायीक दायित्व ५,६१८ रुपये होते, ते यंदा वाढून २.६५ कोटी रुपये झाले आहे. तर कंपनीची मालमत्ता फक्त २ लाख होती. एक वर्षापूर्वी, फर्मकडे कोणतीही निश्चित मालमत्ता नव्हती.
एक वर्षापूर्वी कमी कालावधीसाठी कर्ज आणि अग्रिम म्हणून घेतलेली रक्कम एकूण १०,००० रुपये होती, तर ती यंदा वाढून ४.१४ कोटी रुपये झाली आहे. मागील वर्षी जिथे गोदामांमध्ये काहीही नव्हते, यावर्षी ती ९ कोटींवर गेले.
‘प्रॉडक्ट्स’ च्या विक्रीमुळे फायलींगमध्ये कमाईची ही मोठी वाढ दर्शविली जाते. यात ५१ कोटींच्या परकीय उत्पन्नाचा समावेश आहे. वर्षभरापूर्वी परकीय उत्पन्नही शून्य होते.
या फाईलिंगमध्ये केआयएफएस नावाच्या सूचीबद्ध कंपनीचे १५.७८ कोटींचे असुरक्षित कर्जदेखील उघड झाले आहे. त्याच आर्थिक वर्षासाठी म्हणजेच कर्ज देण्यात आले त्या वर्षी केआयएफएसचा महसूल ७ कोटी होता. केआयएफएस फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वार्षिक अहवालात टेंपल एंटरप्राइझला देण्यात आलेल्या १५.७८ कोटी रुपयांच्या असुरक्षित कर्जाचा उल्लेख नाही.