फ्रान्स, ११ ऑक्टोंबर २०२०: फ्रान्समध्ये एक मोठी विमान दुर्घटना झालीय. हवेतच विमानांनी एकमेकांना धडक दिल्यानं ही दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत पाच लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. फ्रान्सच्या पश्चिम भागात ही धडक झाली ज्यामध्ये एक प्रवासी विमान होते तर दुसरं मायक्रोलाईट विमान होतं. मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोलाईट विमानामध्ये ३ व्यक्ती प्रवास करत होते. अपघातामध्ये हे विमान खाली पडून त्यातील तिघांचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार एका प्रवासी विमानाला (डी ए ४०) एका मायक्रोलाईट विमानानं धडक दिली यामुळं हा अपघात घडला. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते, ज्यानं डी ए ४० या प्रवासी विमानाला भीषण धडक दिली. या प्रवासी विमानात ३ जण प्रवास करत होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मायक्रोलाईट विमान खाली कोसळल्यानंतर त्या भागात मोठी आग लागली, त्यामुळे विमानातील तिन्ही व्यक्ती जागीच ठार झाले. महत्त्वाचं म्हणजे हे मायक्रोलाईट विमान एका घराजवळच पडला असल्यामुळं चिंता वाढली होती. मात्र, यामध्ये घराला कोणतीही ईजा झाली नाही. ही आग मोठी असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विमानांची हवेत टक्कर होताच प्रवासी विमान जवळच्याच एका ठिकाणी लँड झालं त्यामुळं प्रवासी विमानातील होणारी मोठी जीवितहानी टळली. मात्र, मायक्रोलाईट विमान कोसळल्या जागी भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे